Breaking News

अकोला क्राइम न्यूज: नवविवाहित सुनेवर सासऱ्याकडून लैंगिक व मानसिक छळ; खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला

अकोला शहरातील मलकापूर परिसरात राहणाऱ्या नवविवाहित महिलेवर तिच्या सासरच्या कुटुंबीयांनी लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. पीडितेने खदान पोलिस ठाण्यात तक्रार केली असून सासर, दीर, सासू, वहिनी आणि पती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published 17 January 2026, 10:08 IST
Last Updated 17 January 2026, 10:08 IST
ಸ್ನೇಹಿತನ ಕತ್ತು ಕೊಯ್ದು ರಕ್ತ ಕುಡಿದ ಕಿರಾತಕ! ಬೆಚ್ಚಿಬಿದ್ದ ಚಿಂತಾಮಣಿ

4:

अकोला क्राइम न्यूज: नवविवाहित सुनेवर सासऱ्यांकडून लैंगिक व मानसिक छळ; खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

अकोला शहरातील मलकापूर परिसरात राहणाऱ्या एका नवविवाहित महिलेने सासरच्या कुटुंबीयांकडून लैंगिक आणि मानसिक छळ झाल्याचा गंभीर आरोप करत खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी सासरच्या ५ जणांविरुद्ध विनयभंग, मानसिक छळ आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेचे लग्न २५ मे २०२५ रोजी झाले होते. ४ जून रोजी ती पतीच्या संयुक्त कुटुंबात नांदण्यासाठी आली होती. सुरुवातीला सर्व काही चांगलं असल्यासारखं तिला वाटलं, पण काही दिवसांतच सासरच्या घरातील वातावरण बदललं आणि छळ सुरु झाला, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे. समाजात बदनामी होईल या भीतीने सुरुवातीला तिने कोणाकडेही तक्रार केली नाही, असेही तिने सांगितले.

सासरे सुभाष तायडे, दीर शुभम तायडे, सासू वर्षा तायडे, वहिनी शिल्पा तायडे आणि पती ऋषभ तायडे अशी आरोपींची नावे आहेत.

सासऱ्याकडून सतत विनयभंग, दीराने केले अश्लील चाळे

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, सासरे सुभाष तायडे हे घरात कोणी नसताना स्वयंपाकघरात काम करणाऱ्या पीडितेच्या जवळ येत तिच्या अंगाला स्पर्श करत असे. पाठीवर, खांद्यावर आणि कंबरेवर हात फिरवत “तुला जे हवे ते देईन, तुझ्या नवऱ्यात काही दम नाही,” असं सासर सुनेला म्हणत असे, असंही तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे ती घाबरून जात असे आणि स्वतःला खोलीत बंद करून ठेवत असे, असंही पीडितेने सांगितले.

दीर शुभम तायडे विनाकारण पीडित महिलेच्या खोलीत येत असे आणि सौंदर्य, कपडे आणि लज्जास्पद नजरेने पाहत असे, असेही तिने तक्रारीत म्हटले आहे. सततच्या त्रासामुळे ती मानसिकदृष्ट्या खचून गेली होती, असा आरोप आहे.

सासरच्या इतर सदस्यांकडून अप्रत्यक्ष प्रोत्साहन

पीडितेने आरोप केला की आरोपी वर्षा तायडे आणि शिल्पा तायडे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी तक्रार न करता तडजोड करण्याचा सल्ला देत आरोपींच्या वर्तनाला अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले.

सासरांनी “बाबांच्या मनासारखे राहा, तसे केल्यास घरात सुखाने राहशील,” असे सांगून मानसिक छळ केला. पती ऋषभ तायडे कोणताही विरोध न करता “वडील सांगतील तसे वागावे लागेल,” असे पत्नीला सांगत असे.

तक्रार उशिरा का दाखल केली?

३० ऑक्टोबर २०२५ रोजी पतीने पत्नीला माहेरी पाठवले. मानसिक धक्का, भीती आणि समाजात बदनामी होईल या कारणांमुळे पीडित महिलेने तक्रार उशिरा दाखल केली आणि न्यायाची मागणी केली आहे.

सध्याचा तपास

या प्रकरणाचा पुढील तपास खदान पोलीस करत आहेत.

Recent Post

बेळगावात सोनं गहाण कर्जावर गंभीर तक्रारी; खासगी NBFC विरोधात आरोप

बेळगावात सोनं गहाण कर्जावर गंभीर तक्रारी; खासगी NBFC विरोधात आरोप
Published 9 February 2026, 15:52

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 LIVE: पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपूरेंची बिनविरोध निवड

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 LIVE: पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपूरेंची बिनविरोध निवड
Published 9 February 2026, 14:52

गडचिरोलीत एकात्मिक स्टील प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार–सुपर स्मेल्टर्समध्ये MoU; ₹10,100 कोटी गुंतवणूक, 1,000 रोजगार

गडचिरोलीत एकात्मिक स्टील प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार–सुपर स्मेल्टर्समध्ये MoU; ₹10,100 कोटी गुंतवणूक, 1,000 रोजगार
Published 6 February 2026, 21:22

32 वर्षांनंतरही ऐश्वर्या रायचाच जलवा! मोठा पोलीस बंदोबस्त, चाहत्यांची गर्दी; व्हिडिओ व्हायरल

32 वर्षांनंतरही ऐश्वर्या रायचाच जलवा! मोठा पोलीस बंदोबस्त, चाहत्यांची गर्दी; व्हिडिओ व्हायरल
Published 6 February 2026, 10:55

हरिद्वार येथे स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज समाधी मंदिरात विग्रह मूर्ती स्थापना | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित

हरिद्वार येथे स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज समाधी मंदिरात विग्रह मूर्ती स्थापना | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
Published 6 February 2026, 10:51

नेसरी पोलीस एपीआय चेतन मसुठगे यांचे 100% मतदानासाठी जाहीर आवाहन; गावोगावी पोलिस बंदोबस्त | 24x7 Live Marathi

नेसरी पोलीस एपीआय चेतन मसुठगे यांचे 100% मतदानासाठी जाहीर आवाहन; गावोगावी पोलिस बंदोबस्त | 24x7 Live Marathi
Published 5 February 2026, 20:27

नेसरी येथील ज्येष्ठ नागरिक सुमन फगरे यांचे निधन

नेसरी येथील ज्येष्ठ नागरिक सुमन फगरे यांचे निधन
Published 3 February 2026, 19:11

कोल्हापूर आदर्श वसाहतीतील प्रॉपर्टीला वाढती मागणी; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण निवेदन

कोल्हापूर आदर्श वसाहतीतील प्रॉपर्टीला वाढती मागणी; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण निवेदन
Published 3 February 2026, 17:02

जिल्हा परिषद उमेदवार गिरजादेवी शिंदे यांना महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा

जिल्हा परिषद उमेदवार गिरजादेवी शिंदे यांना महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा
Published 1 February 2026, 20:18

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं का? फडणवीसांनी सगळं खरं सांगितलं; थेट प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं का? फडणवीसांनी सगळं खरं सांगितलं; थेट प्रतिक्रिया
Published 1 February 2026, 15:20

NCP Merger : 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाची घोषणा ठरलेलीच होती? प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरेंना माहिती असावी – अण्णा बनसोडेंचा दावा

NCP Merger : 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाची घोषणा ठरलेलीच होती? प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरेंना माहिती असावी – अण्णा बनसोडेंचा दावा
Published 1 February 2026, 09:21

Supriya Sule : सुनेत्रा पवार मुंबईत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार; सुप्रिया सुळे काटेवाडीला आशाताईंना भेटायला का पोहोचल्या?

Supriya Sule : सुनेत्रा पवार मुंबईत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार; सुप्रिया सुळे काटेवाडीला आशाताईंना भेटायला का पोहोचल्या?
Published 1 February 2026, 09:17