2:
इतिहास घडवायचा असेल तर मागे वळून पाहायचं नसतं. निवडणुका आल्या की अनेकदा रुसवे-फुगवे होत असतात; मात्र हे सर्व विसरून पक्षनिष्ठा आणि संघटनशक्तीच्या जोरावर काम करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. हेमंत कोलेकर यांनी केले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपा बूथ प्रमुख व शक्ती केंद्रप्रमुखांची बैठक थोरला वाडा येथे पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. येणाऱ्या निवडणुकीत ताकदीने रिंगणात उतरून नेसरी विभागाच्या शाश्वत विकासासाठी जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा भाजपाचे कमळ फुलणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ही बैठक नेसरी जिल्हा परिषद उमेदवार गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर, नेसरी पंचायत समिती उमेदवार विजय पाटील व हडलगे पंचायत समिती उमेदवार सौ. हर्षदा भिकले यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्य अशोक पांडव यांनी स्वागत केले. त्यानंतर उमेदवारांची ओळख करून देण्यात आली. यावेळी गुरुदास भिकले व दयानंद चौगुले यांनी नेसरी विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.
या बैठकीस अजितसिंह शिंदे, सौ. संयोगिता शिंदे, संग्रामसिंह शिंदे, सांबरे सरपंच ज्योती खराडे, हडलगे सरपंच हनुमंत पाटील, तावरेवाडी उपसरपंच प्रशांत तुरटे, माजी सरपंच आशिष साखरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष मजीद वाटंगी यांच्यासह बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार संतोष नाईक यांनी मानले.