2:
कोल्हापूर जिल्ह्यातील नेरसी पोलीस ठाण्यात एका गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार राहुल विजय कुर्टेकर (रा. वडगाव, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्वप्नील रविंद्र राणे (रा. कोल्हापूर) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी सुमारे 2 वाजता नेरसी ते अडूर मार्गावर कांडेवाडी गावाजवळ हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. आरोपीने KIA Sonet (MH04 DN 3749) आणि MH09 GA 7515 या वाहनांचा वापर करून तक्रारदाराच्या वाहनाला जोराची धडक दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेत तक्रारदार, त्यांची पत्नी, सासू तसेच 7 दिवसांचे बाळ जखमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या प्रकरणी आरोपीविरोधात भा.दं.वि. कलम 281, 125(a), 125(b), 324(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नेरसी पोलीस करत आहेत.