3:
जिल्हा प्रतिनिधी | शिवाजी पाटील
कोल्हापूर | नेसरी
नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विद्याधर गुरबे यांच्या प्रचाराला सध्या मोठा जोर आला आहे. मतदारसंघात विविध ठिकाणी प्रचार फेऱ्या, बैठका आणि जनसंपर्क वाढवण्यात येत असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
विद्याधर गुरबे हे याआधीपासूनच राजकारणात सक्रिय असून तळागाळातील जनतेशी त्यांचा थेट संबंध आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपला राजकीय प्रवास केला असून, २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण असा त्यांचा आजपर्यंतचा कार्यप्रवास राहिला आहे.
काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणारे विद्याधर गुरबे हे जिल्ह्यातील नेते बंटी पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून कार्यकर्त्यांमध्ये त्यांची चांगली पकड आहे.
मतदारसंघात सध्या अशी चर्चा आहे की, सत्तेसाठी पक्ष बदलणारे नेते असताना, विद्याधर गुरबे हे पक्षाशी निष्ठावंत राहिलेले कार्यकर्ते आहेत. पोलीस स्टेशन, पंचायत समिती, तहसील कार्यालय आदी ठिकाणी सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात.
आगामी निवडणुकीत आपल्या भागाचा विकास साधायचा असेल, तर विद्याधर गुरबे यांना निवडून देणे योग्य ठरेल, अशी चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे.