2:
जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पाटील यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ. गिरजादेवी शिंदे यांना लाडक्या बहिणींचा भावनिक पाठिंबा मिळत असून त्या विविध भागांमध्ये प्रचार करत आहेत.
गेल्या आठ ते दहा वर्षांपासून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक कार्यरत असल्याने परिसरातील विकास रखडला, अशी भावना महिलावर्गातून व्यक्त होत आहे. त्यामुळे आमच्या पंचक्रोशीतील हक्काच्या उमेदवार असलेल्या गिरजादेवी शिंदे या निश्चितच विकासाला गती देतील, अशी चर्चा गावोगावी सुरू आहे.
तसेच सरपंच पदाचा अनुभव असल्यामुळे त्या अनुभवाचा उपयोग विकासकामांसाठी प्रभावीपणे होईल, असा विश्वास महिलावर्ग व्यक्त करत आहे. महिलांकडून जोमाने प्रचार सुरू असून सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे.