Breaking News

Supriya Sule : सुनेत्रा पवार मुंबईत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार; सुप्रिया सुळे काटेवाडीला आशाताईंना भेटायला का पोहोचल्या?

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे बारामतीतील काटेवाडी येथे अजित पवारांच्या आई आशाताईंना भेटायला पोहोचल्या. नेमकं कारण काय?
Published 1 February 2026, 09:17 IST
Last Updated 1 February 2026, 09:17 IST
ಸ್ನೇಹಿತನ ಕತ್ತು ಕೊಯ್ದು ರಕ್ತ ಕುಡಿದ ಕಿರಾತಕ! ಬೆಚ್ಚಿಬಿದ್ದ ಚಿಂತಾಮಣಿ

3:

एकीकडे मुंबईत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असताना, दुसरीकडे बारामतीतून महत्त्वाची राजकीय हालचाल समोर आली आहे. सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांची भेट घेण्यासाठी काटेवाडी येथे पोहोचल्या आहेत.

सुप्रिया सुळे काटेवाडीतील अजित पवारांच्या निवासस्थानी गेल्या असून, त्यांनी आशाताईंशी जवळपास अर्धा तास चर्चा केली. अजित पवारांच्या अपघातानंतर बराच वेळ त्यांच्या आईला घटनेची माहिती देण्यात आली नव्हती. बारामती, काटेवाडीसह संपूर्ण राज्यात अजित पवारांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीबाबत माहिती नसल्याचे शरद पवार यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितले. मुंबईत राजकीय घडामोडी सुरू असतानाच सुप्रिया सुळे काटेवाडी येथे आशाताईंना भेटण्यासाठी गेल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सुप्रिया सुळे या आज दिल्लीला जाणार असून, सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर होणार असल्याने त्या दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्लीला जाण्यापूर्वी त्या आशाताईंना भेटण्यासाठी काटेवाडीला गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“उद्या देशाचं बजेट आहे. त्यासाठी मला दिल्लीला जायचं आहे. पुण्याहून मी दिल्लीला जाणार आहे. त्याआधी आशाकाकींना भेटण्यासाठी आले होते,” असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

पार्थ पवार गोविंदबागेत; राजकीय चर्चांना वेग

दरम्यान, सुनेत्रा पवार या शरद पवार किंवा पवार कुटुंबातील अन्य सदस्यांशी राजकीय चर्चा न करता मुंबईत गेल्याची चर्चा सुरू होती. अशा पार्श्वभूमीवर पार्थ पवार हे गोविंदबागेत शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी एकमताने निवड

सुनेत्रा पवार आज (31 जानेवारी) सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. शपथविधीपूर्वी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांचे नाव गटनेतेपदासाठी सुचवले, तर छगन भुजबळ यांनी त्याला अनुमोदन दिले. परिणामी, सुनेत्रा पवार यांची एकमताने गटनेतेपदी निवड झाली.

कोणती खाती सुनेत्रा पवारांकडे राहणार?

अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रिपदासोबत अर्थसह महत्त्वाची खाती होती. मात्र, सध्या अर्थ खाते वगळता इतर खाती सुनेत्रा पवारांकडेच राहणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभाग ही जबाबदारी त्यांच्याकडे कायम राहणार आहे. अर्थसंकल्प अधिवेशनानंतर अर्थ खातेही त्यांच्याकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज मात्र केवळ सुनेत्रा पवार यांचाच शपथविधी होणार आहे.

Recent Post

बेळगावात सोनं गहाण कर्जावर गंभीर तक्रारी; खासगी NBFC विरोधात आरोप

बेळगावात सोनं गहाण कर्जावर गंभीर तक्रारी; खासगी NBFC विरोधात आरोप
Published 9 February 2026, 15:52

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 LIVE: पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपूरेंची बिनविरोध निवड

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 LIVE: पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपूरेंची बिनविरोध निवड
Published 9 February 2026, 14:52

गडचिरोलीत एकात्मिक स्टील प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार–सुपर स्मेल्टर्समध्ये MoU; ₹10,100 कोटी गुंतवणूक, 1,000 रोजगार

गडचिरोलीत एकात्मिक स्टील प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार–सुपर स्मेल्टर्समध्ये MoU; ₹10,100 कोटी गुंतवणूक, 1,000 रोजगार
Published 6 February 2026, 21:22

32 वर्षांनंतरही ऐश्वर्या रायचाच जलवा! मोठा पोलीस बंदोबस्त, चाहत्यांची गर्दी; व्हिडिओ व्हायरल

32 वर्षांनंतरही ऐश्वर्या रायचाच जलवा! मोठा पोलीस बंदोबस्त, चाहत्यांची गर्दी; व्हिडिओ व्हायरल
Published 6 February 2026, 10:55

हरिद्वार येथे स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज समाधी मंदिरात विग्रह मूर्ती स्थापना | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित

हरिद्वार येथे स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज समाधी मंदिरात विग्रह मूर्ती स्थापना | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
Published 6 February 2026, 10:51

नेसरी पोलीस एपीआय चेतन मसुठगे यांचे 100% मतदानासाठी जाहीर आवाहन; गावोगावी पोलिस बंदोबस्त | 24x7 Live Marathi

नेसरी पोलीस एपीआय चेतन मसुठगे यांचे 100% मतदानासाठी जाहीर आवाहन; गावोगावी पोलिस बंदोबस्त | 24x7 Live Marathi
Published 5 February 2026, 20:27

नेसरी येथील ज्येष्ठ नागरिक सुमन फगरे यांचे निधन

नेसरी येथील ज्येष्ठ नागरिक सुमन फगरे यांचे निधन
Published 3 February 2026, 19:11

कोल्हापूर आदर्श वसाहतीतील प्रॉपर्टीला वाढती मागणी; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण निवेदन

कोल्हापूर आदर्श वसाहतीतील प्रॉपर्टीला वाढती मागणी; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण निवेदन
Published 3 February 2026, 17:02

जिल्हा परिषद उमेदवार गिरजादेवी शिंदे यांना महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा

जिल्हा परिषद उमेदवार गिरजादेवी शिंदे यांना महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा
Published 1 February 2026, 20:18

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं का? फडणवीसांनी सगळं खरं सांगितलं; थेट प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं का? फडणवीसांनी सगळं खरं सांगितलं; थेट प्रतिक्रिया
Published 1 February 2026, 15:20

NCP Merger : 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाची घोषणा ठरलेलीच होती? प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरेंना माहिती असावी – अण्णा बनसोडेंचा दावा

NCP Merger : 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाची घोषणा ठरलेलीच होती? प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरेंना माहिती असावी – अण्णा बनसोडेंचा दावा
Published 1 February 2026, 09:21

Supriya Sule : सुनेत्रा पवार मुंबईत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार; सुप्रिया सुळे काटेवाडीला आशाताईंना भेटायला का पोहोचल्या?

Supriya Sule : सुनेत्रा पवार मुंबईत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार; सुप्रिया सुळे काटेवाडीला आशाताईंना भेटायला का पोहोचल्या?
Published 1 February 2026, 09:17