2:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र सरकार आणि सुपर स्मेल्टर्स लिमिटेड यांच्यात गडचिरोली येथे एकात्मिक स्टील प्रकल्प उभारणीसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ₹10,100 कोटींची गुंतवणूक होणार असून सुमारे 1,000 रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.
या प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. सामंजस्य कराराच्या स्वाक्षरी व अदलाबदली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूषविले.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हा प्रकल्प Advantage Vidarbha उपक्रमाला बळ देणारा ठरणार आहे.