6:
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड अधिग्रहणाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव वाढवला आहे. या प्रस्तावाला पाठिंबा न देणाऱ्या मित्रदेशांवर टॅरिफ, आर्थिक निर्बंध आणि राजनैतिक कारवाई करण्यात येऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे.
ग्रीनलँड अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचा दावा ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला. या मुद्द्यावर विरोध करणाऱ्या देशांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
इतकेच नव्हे तर, नाटो (NATO) या लष्करी आघाडीकडून ग्रीनलँड संदर्भात पाठिंबा न मिळाल्यास अमेरिका नाटोमधून बाहेर पडण्याचा विचार करू शकते, असे संकेतही ट्रम्प यांनी दिले आहेत. या वक्तव्यांमुळे आर्क्टिक क्षेत्रात तसेच ट्रान्स-अटलांटिक आघाडीत तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.