4:
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात माणुसकीला आणि गुरु-शिष्यांच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. कागल तालुक्यातील एका आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या शिक्षकानेच असे कृत्य केल्याने पालकांचं टेन्शन वाढलंय. काय आहे प्रकरण? कागल तालुक्यातील एका आश्रम शाळेत कृष्णा ज्ञानू दाभोळे (वय 55, रा. सावर्डेकर कॉलनी, मुरगूड) हा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होता. याच शाळेत पीडित मुलगी शिक्षण घेत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत मुख्याध्यापकाने या मुलीवर अत्याचार केले.