3:
पंचायत समिती गडहिंग्लज निवडणुकीसाठी शिंदे गट शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रवींद्र हिडदुगी यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. रवींद्र हिडदुगी हे सेवानिवृत्त कर्मचारी असून, त्यांनी दीर्घकाळ समाजकार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक सामाजिक अन्यायांना वाचा फोडली आहे.
युवकांना प्रोत्साहन देणे, सामाजिक जाणीव निर्माण करणे आणि जनसामान्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवणे, हे त्यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. त्यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
हा सर्व अनुभव पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच त्यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गडहिंग्लज तालुक्यात विकासाभिमुख नेतृत्वाबाबत नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.